विधवा महिलांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विधवा महिला पेन्शन योजनेला सुरवात केलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरीब कुटुंबातील विधवां महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील विधवां महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 600 रुपये मासिक पेन्शन दिली जाते. ही राज्य सरकार कडून चालवली जात असलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा उद्देश, महिलांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या महिलांची काळजी घेण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही, त्यांचा उदरनिर्वाह आणि आर्थिक स्थिती बिकट होते आणि अश्या महिलाना संसाराचा गाडा चालवण्यात भरपूर अडचणी येतात. त्यांच्याशी भेदभाव केला जातो आणि त्यांना वाईट वागणूक दिली जाते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने राज्यातील गरीब, असहाय्य विधवांसाठी हि योजना चालू केलेली आहे. आम्ही या लेखा मध्ये, महाराष्ट्र विधावा पेन्शन योजने बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जसे की या योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे, पात्रता, आवश्यक कागदपत्रे इत्यादी. त्यामुळे या योजनेची संपूर्ण माहित आणि नोंदणी प्रक्रिया विषई अधिक माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग या योजने विषई जाणून घेहू.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि असहाय्य विधवा महिलांसाठी महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनाला प्रारंभ केला आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे, महिलांच्या पतीच्या मृत्यू पाश्च्यात त्या महिलांची काळजी घेण्याची आणि देखरेखीची जबाबदारी त्या कुटुंबा कडून घेतली जात नाही, त्यांचा उदरनिर्वाह आणि आर्थिक परिस्थिती आणखी बिघडते व त्याना कुटुंब चालवणे आवघड होते. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने राज्यातील गरीब, असहाय्य विधवा महिलांसाठी योजना चालू केली आहे. या महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब कुटुंबातील विधवांना दरमहा 600 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. या योजनेंतर्गत महिलांना सक्षम आणि स्वावलंबी करणे हे सरकारचे ध्येय आहे, त्याअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जेणेकरून या गरीब विधवांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आणि त्यांचे म्हातारपण सुरक्षित होईल तसेच महिलांना त्यांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालनपोषणासाठी या पेन्शनची आर्थिक मदत होहील. महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने २३ लाखांचा अर्थसंकल्पस मान्यता दिली आहे. महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर योजनेतील पेन्शनमुळे तिला कोणावरही अवलंबून न राहता स्वतःचे जीवन जगता येणार आहे. राज्यातील ज्या इच्छुक विधवा महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना या योजनेमध्ये अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाकडून देण्यात येणारी मासिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
आपण महाराष्ट्र राज्याचे साहीवाशी असाल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत एखाद्या महिलेच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्य असल्यास त्या कुटुंबाला दरमहा ९०० रुपये पेन्शन दिली जाणार आहे. त्यांची मुले 25 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी मिळेपर्यंत, यापैकी जे आधी असेल, तोपर्यंत महाराष्ट्र विधा पेन्शन योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे. जर एखाद्या महिलेला फक्त मुली असतील तर, तिच्या मुलीचे वय 25 वर्षे पूर्ण झाले किंवा लग्न झाले तरीही हा लाभ कायम राहणार आहे. मुलीच्या वयाच्या ६५ वर्षापर्यंत सरकारच्या या योजनेचा लाभ देणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील इच्छुक विधवा महिलांनी या योजनेंतर्गत अर्ज करावा लागतो याविषई संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचे उद्दिष्ठे काय आहेत?
पतीच्या मृत्यूनंतर पत्नी व मुलांना दुसरा आधार मिळत नाही आणि विधवा महिलांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण जाते आणि महिलेला कोणत्याही प्रकारचा आधार जात नाही, तिची आर्थिक स्थितीही कमकुवत असते आणि ती तिच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक गरजा भागवू शकत नाही, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने ही विधवा निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे. या सर्व अडचणी लक्षात घेहून महाराष्ट्र सरकारने अश्या महिलाना आर्थिक मदत देण्याच्या या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील गरीब व असहाय्य महिलाना सरकार दरमहा ६०० ते ९०० रुपये देते. या योजनेद्वारे राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेहून अश्या महिलाना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनाची सुरुवात 2021 मध्ये केली आहे
विधवा महिलांना शासनाच्या या सहकार्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चांगलीच मदत होणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र विधवा महिला योजनेचा लाभ हा अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहज घेता येतो, या योजनेत स्वारस्य असलेल्या अर्जदाराचे एकूण वार्षिक उत्पन्न किंवा एकूण कौटुंबिक उत्पन्न 21 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलाना त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांना स्वावलंबी बनवणे हे या योजनेच्या माध्यमातून सध्या होणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा आधार नाही त्यांना आर्थिक मदत देऊन स्वावलंबी बनवने सोईस्कर होणार आहे.
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचे फायदे
काही महिलाना त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचा नसतो. त्यामुळे त्याना जीवन जगणे कठीण होते त्याना कोणत्याही प्रकारचा उत्पन्नाचा मार्ग नसतो अश्या निराधार महिलासाठी सरकारने मदतीचे पाऊल उचलले आहे आणि महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेला सुरूवात केली. या योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत ते जाणून घेहुया.
- महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेत राज्यातील विधवा महिलांना शासनाकडून दरमहा ६०० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच त्या महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या कुटुंबांना दरमहा ९०० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- जर त्या विधवा महिलेला फक्त मुली असतील तर, त्या मुली २५ वर्षांची किंवा तिचे लग्न झाल्यानंतर हि या योजनेचा फायदा कायम चालू राहतो.
- जर त्या विधवा महिलेला मुलगा असेल तर, तो मुलगा २५ वर्षांचा झाल्या नंतर या योजनेचा लाभ बंद करण्यात येतो
- ज्यांना आधार नाही अश्या महाराष्ट्रातील रहिवासी महिलाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत हि थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.
- महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब विधवा महिला ज्यांचे वार्षिक उत्पन्न २१०० पेक्षा कमी आहे अश्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यास पात्रता व अटी
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी शासनाने काही पात्रता आणि नियम लागू केले आहेत, या पात्रता आणि अटी मध्ये बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. खाली नमूद केलेल्या नियमव अटी जाणून घेहूया.
- या योजनेचा लाभ घेणार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय हे ६५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- दारिद्र्य रेषेचे कार्ड धारक संपूर्ण विधवा महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचे कोणत्याही बँकत खाते असणे गरजेचे आहे आणि ते बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
- २१०० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलाना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महाराष्ट्र विधा पेन्शन योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे. कागदपत्रांसह महिला आपला अर्ज भरू शकतात आणि योजनेशी संबंधित लाभ मिळवू शकतात. आम्ही खाली काही या योजनेच्या नोंदणी साठी लागनाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे त्यानुसार सर्व कागदपत्रे तयार करावीत.
- योजनेच्या लाभारती महिलेचे कोणतेही ओळखपत्र असणे गरजेचे आहे (आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र)
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पनाचा दाखला
- अर्जदार महिलेचे चालू बँक खाते आणि बँक पासबुक असणे गरजेचे आहे.
- राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र गरजेचे आहे.
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचे फोटो
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे
- वय प्रमाणपत्र ( शाळा सोडलेला दकला किंवा अन्य वय नमूद असलेली कागदपत्रे )
- कोणतीही अर्जदार महिला अनुसूचित जाती किंवा मागास प्रवर्गातील असल्यास त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
- पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या मार्गदर्शकाचे अनुसरण करून त्या प्रमाणे अर्ज करावा. अर्ज करताना कोणत्याही अडचणी आल्यास आपल्या गावातील तलाठी कार्यालया मध्ये जाहून माहिती घ्यावी आणि सर्व पडताळणी झाल्यावर आपण अर्ज तहसीलदार कार्यालयाकडे पाठहू शकता.
- सर्वप्रथम, तुम्हाला महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यासाठी येते क्लिक करा
- अधिकृत वेबसाइटवर पोहचल्यावर, तुमच्यासमोर एक मुख्यपृष्ठ उघडेल त्याचा फोटो खाली दिलेला आहे. त्यामध्ये लाल रंगामध्ये एक बटण आहे ज्यावर view असे लिहिले आहे त्यावर क्लिक करा.
- त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेच्या अर्जाची PDF डाउनलोड होहील. त्या अर्जाची तुम्हाला प्रिंट कडून घावी लागेल.
- अर्ज प्रिंट केल्यानंतर, तुम्हाला त्यामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे गरजेचे आहे.
- सर्व माहिती काळजीपूर्वक भरून झाल्यावर, त्यासाठी लागणारी सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडावे लागेल.
- संपूर्ण कागदपत्रे जोडली असल्याची खात्री करा.
- यानंतर तुम्हाला तो अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार / तलाठी कार्यालय याठिकाणी जाऊन जमा करावी लागतात.
- अर्जाची पडताळणी झाल्यावर तुमच्या खात्यावर महिन्याला तुम्ही पात्र असलेल्या योजनेनुसार पैसे जमा होतील.
वरील माहितीचा निष्कर्ष ( Conclusion )
या लेखात आम्ही महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना महिलांसाठी असलेल्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा लेख वाचल्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही विधवा महिलेला या योजनेची संपूर्ण माहिती मिळू शकते आणि ती या योजनेचा अगदी सहज लाभ घेऊ शकते. या माहितीशिवाय तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास तुम्ही खालील कमेंट विभागात जाऊन आम्हाला मेसेज पाठवू शकता आम्ही तुमच्या शंकांचे निरसन करू धन्यवाद. आपणास अश्याच योजनेविषई माहिती हवी असल्यास खालील बटणला क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या अधिक योजना पहा