ऊस हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे आणि मोठ्या प्रमाणात घेतले जाणारे पीक आहे. उसाचे उत्पादक आणि त्याचा दर याचा विचार करता या पिकाचे उत्पादन घेणे आर्थिक दृष्ट्या फायद्याचे ठरते. कमी गुंतवणूक आणि जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे जास्ती जास्त शेतकरी या पिकाची निवड करतात.
ऊस हे भरपूर काळ उत्पादन देणारे पीक आहे म्हणजे ऊसाची एकदा लागवड केली कि ते जवळपास ३ वर्षे त्याची परत लागण करावी लागत नाही. जास्त काळ उत्पादन देणाऱ्या पिकामुळे त्याची लागवड योग्य पद्धतीने आणि तांत्रिक दृष्ट्या करणे गरजेचे आहे. योग्य लागवड पद्धत आपल्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ करू शकते.
आपण या लेखा मध्ये ऊस लागावढीची योग्य पद्धत, कोणत्या वाणाची लागवड करावी, पाणी नियोजन, खतांचा योग्य वापर, रोग नियंत्रण कसे करावे या बद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत. वरील बाबी लक्षात घेहून ऊस पिकाची लागण केल्यास आपणस भरगोस उत्पादन मिळण्यास मदत होहील. चला जाणून घेहुया ऊस लागवड माहिती मराठी मध्ये.
Table of Contents
ऊस लागवडीचे महत्त्व
ऊस हे कमी पैश्यात जास्त उत्पादन देणारे पीक आहे. त्यामुळे ऊस लागवडीस फार महत्व आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळते. चांगले उत्पादन मिळवण्यासाठी योग्य आणि पध्दतशीर ऊस लागवड करणे अत्यंत महत्वाचे आहे. शेतकऱ्याची उन्नती आणि देशाची आर्थिक प्रगती मध्ये ऊस पिकाचे मोठे योगदान आहे. अनेक साखर कारखाने या पिकावर अवलंबून आहेत. साखर उत्पादनामुळे देशाला भरपूर निधी मिळते.
ऊस हे पीक ग्रामीण भागातील आणि सर्व स्तरातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक स्त्रोत आहे. या पिकामुळे गरमीने भागातील लोकांचे राहणीमान, शिक्षण, आरोग्य आणि जीवनातील गरजा भागवणे सहज शक्य झाले आहे. ऊस उत्पादनाचे ग्रामीण विकास आणि उद्योग वाढीमध्ये मोठे योगदान आहे. ऊस लागवडीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करणे आणि त्यांचे राहणीमान आणि बाकीच्या सर्व गोष्टी मध्ये सुधारणा करण्यामध्ये या पिकाची महत्वाची भूमिका आहे.
ऊस लागवडीची पूर्व तयारी कशी करावी
आपणास माहित आहे कि ऊस हे २ ते ३ वर्षे एक लागवडीवर उतपादन देणारे पीक आहे. जास्त काळ उत्पादन देणाऱ्या या पिकामध्ये लागवडीपूर्वी चांगली मशागत करणे फार महत्वाचे आहे. चांगली मशागत केल्याने ऊसची लागवड यशस्वीरित्या केली जाऊ शकते. ऊस लागवडीची पूर्व तयारी करण्याच्या प्रक्रियेमध्ये योग्य जमिनीची निवड करणे, जमिनीच्या प्रकरानुरूप बियाणाची निवड करणे, शेतीला शेणखत देणे अश्या गोष्टीचा समावेश होतो. यासर्व गोष्टी उसाच्या चांगल्या उत्पादनावर परिणाम करतात.
उसाची जोमदार आणि एकसमान वाढ होण्यासाठी आणि उसाच्या मुळीची चांगली वाढ होण्यासाठी शेताची चांगली मशागत होणे अत्यंत गरजेचे आहे. उसाच्या मुळ्या जमिनीत जवळ जवळ ६० सेमी पेक्षा जास्त खोलवर पसरतात. त्यामुळे ऊस लागवड करण्याची जमीनिमध्ये प्रथम उभ्या व नंतर आडव्या पद्धतीने खोल नांगरणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर ४ ते ५ ट्रेलर चांगले कुजलेले शेणखत आणि शक्य असल्यास कंपोस्ट खत २ ट्रेलर जमिनीत सगळीकडे पसरून घ्यावे. संपूर्ण खत पसरून झाल्यावर रोटाव्हेटर मारून घ्यावा जेणेकरून संपूर्ण खत आणि माती मिसळून जाईल. नंतर आपली जमीन आणि हवामान यांचा विचार करून योग्य बियाणाची निवड करावी त्यासाठी जवळच्या कृषी दुकाने किंवा तालुका स्तरीय कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.
हा लेख पण वाचा: आधुनिक अंगूर खेती की संपूर्ण जानकारी
ऊस लागवडीची पद्धत
योग्य लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास उसाची लागण चांगली होते आणि उत्पादन देकील जास्त मिळण्यास मदत होते. ऊस लागवड प्रक्रियेमध्ये अनेक पद्धतीचा वापर केला जातो. त्यामध्ये पारंपरिक ऊस लागवड पद्धतीमध्ये अडीच ते तीन फूट रुंदीची सरी सोडली जाते. आणि ३ डोळ्याची उसाची कांडी लागवडीसाठी घेतली जाते. आता यामध्ये बदल करून २न सरी मधील अंतर ४ ते ५ पुटापरेंत ठेवले जाते आणि २ रोपांमधील अंतर जे १.५ ते २ फूट ठेवले जाते. जुन्या पद्धतीमध्ये सरीतील अंतर कमी होते त्यामुळे पिकामध्ये गर्दी जास्त होहून पीक मोठे झाल्यावर त्यामध्ये पाणी सोडण्यास किंवा फवारणी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत त्यातील काही पद्धतीची माहिती खाली दिलेली आहे.
1. जमीन ओलावून लागवड पद्धत
उसाची लागवड करत असताना शक्य असेल तर लागवडी पूर्वी जमीन संपूर्ण पाटाने पाणी देऊन ओलावून घेणे फायद्याचे ठरते. त्यानंतर १.५ ते २ अंतरावर उसाची लागवड केल्यास ऊस जोमाने फुटण्यास मदत होते जमिनीत आधीच ओलावा असल्यामुळे संपूर्ण डोळे फुटतात त्यामध्ये मर होण्याची शक्यता कमी असते. पाणी दिल्यामुळे उसाची कांडी जमिनीत खोत जाते त्यामुळे मुळांच्या वाढीसाठी चालना मिळते.
2. लांब सरी पद्धत
या पद्धतीमध्ये ४ ते ५ फूट अंतरावर लांब सारी पाडावी आणि त्यामध्ये पाणी सोडून जमीन ओलावून घ्यावी नंतर त्यामध्ये उसाची लागवड करावी. जमिनीच्या चढ आणि उतारानुसार सरीची लांबी 100 फूट ते 120 फूट असावी. या पद्धतीने लागवड केल्यास जास्त वेळ पाणी सारी मध्ये वाहत राहिल्यामुळे पिकास पाणी चांगल्या प्रकारे मिळते आणि पिकाची जोमाने वाढ होते. हे पीक कार्यक्षम पीक असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया या पिकामध्ये चांगली होते आणि हे पीक आपले अन्न चांगल्या प्रकारे तयार करतात. या पदतीने लागवड केल्यास चांगला फायदा होतो पण पाण्याचा कमतरता असेल तर हि पद्धत वापरू नये.
3. एक डोळा लागवड पद्धत
या पद्धतीमध्ये लागवड करताना उसाचा फक्त एका डोळ्याची लागवड केली जाते. उसाच्या डोळ्याच्या मध्यभागी कापून एक एक कांडी लागवड केली जाते. या पद्धतीमध्ये पाण्याची बाजाचात होते. पाणी आणि बियाणे कमी लागल्यामुळे खर्चात मोठी बचत होते.
4. दोन डोळे लागवड पद्धत
यापद्धतीमध्ये उसाची लागवड करत असताना बियाण्यामधील अंतर हे 10 ते 20 सेंटिमीटर ठेवणे गरजेचे आहे. २ डोळ्याची निवड केली असल्यामुळे बियाणे कमी लागते आणि रोपातील अंतर देकील जास्त ठेवले जाते या पद्धतीमध्ये फुटव्याची संख्या हि जास्त असते त्यामुळे साहजिकच उत्पादन देकील जास्त येते.
5. पट्टा पद्धत लागवड
पट्टा पद्धतीमध्ये उसाची लागवड केल्यामुळे २ न ओळीतील अंतर हे जास्त असते त्या अंतरामध्ये आपन दुसरे अंतर पीक घेहू शकतो. या पद्धती मधील उसाचे उत्पादक आणि पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येते सूर्यप्रकाश व हवा खेळती असल्यामुळे पिकाची वाढ जोमोट होते आणि उत्पादनात वाढ होते तसेच याचा दुसरा फायदा आपापल्या या मध्ये दुसरे पीक देकील घेता येते. अंतर जास्त असल्यामुळे पिकावर रोगाचे प्रमाण देकील कमी होते. तसेच तन वाढीवर देकील नियंत्रण ठेवता येते. या पद्धतीमध्ये अडीच ते तीन फूट अंतरावर सरी पाडून घ्यावेत लागते सुरुवाती उसाची लागण २ ना सरीमध्ये करून घ्यावी लागते अंडी एक सारी मोकळी सोडावी लागते म्हणजे याची जोडओळ तयार होते आणि प्रत्येक ओळीतील अंतर ६ पुटापरेंत राहते.
ऊस लागवडीच्या समस्या आणि नियंत्रण
ऊस पिकाची लागवड करताना आणि त्याची जोपासना करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आणि या येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि त्यांच्या वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि रोग नियंत्रण हे ऊस पिकाच्या चांगल्या उत्पादनात मदत करते. उसामध्ये येणाऱ्या काही समश्या आणि त्यांचे नियंत्रण या विषई माहिती घेहुया.
कीड आणि रोग नियंत्रण
उसामध्ये अलीकडे कीड आणि रोगाचे प्रादुर्भाव वाढले आहेत. उसाच्या वाढीच्या आवस्ते मध्ये किंवा ऊस लहान असताना मोठ्या प्रमाणात कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. या समश्या दूर करण्यासाठी चांगल्या प्रतीच्या कीटकनाशकांचा आणि बुरशी नाशकांचा वापर केला जातो.
पाण्याची कमतरता
ऊस पिकाला पाण्याची जास्त गरज असते उसाच्या वाढीमध्ये जर पाणी कमी पडले तर मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही ऊस पिकाची निवड करताना पुरेषे पाणी असल्याची खात्री करून या पिचई निवड करावी. या पिकाच्या योग्य वाढीसाठी आणि जास्त उत्पादनाच्या वाढीसाठी पाणी हे महत्वाचे आहे.
उपयुक्त खतांचे नियोजन
उसाच्या उत्तम वाढीसाठी अनेक उपयुक्त खताची आवश्यकता असते तुमच्या जमिनीतील खताच्या कमतरतेनुसार मातीची तपासणी करून त्यामधील अन्नघटकांची उपयुक्तता तपासून खताचे नियोजन करणे गरजेचे आहे. ऊस लागवडीची मशागत करत असताना जास्त शेणखताचा वापर करणे योग्य आहे ज्यामुळे शेंद्रीय खाते पिकास मजबूत ठेवतात.
Conclusion (निष्कर्ष)
ऊस लागवड करणे हि एक फायद्याची गोस्ट आहे. ऊस लागवड करणे आणि त्याची चांगले उत्पादन घेणे यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे यामध्ये हवामान, मातीची परिस्थिती आणि योग्य व्यवस्थापन, रोग नियंत्रण, तण नियंत्रण यांचे योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. ऊस पिकातील काही महत्वाच्या गोष्टी समजून घेहून जर उसाचे उत्पादन घेतले तर यामध्ये विक्रमी उत्पादन घेणे सहज शक्य आहे. वरील गोष्टीचा विचार करता ऊस पीक हे फायद्याचे आहे आणि चांगले आर्थिक उत्पादन मिळून देणारे आहे. या लेखाच्या माध्यमातून आमी सुचवलेल्या पद्धती आणि योग्य नियोजन केल्यास ऊस शेती फायद्याची ठरेल यात शंका नाही.
और फसलों की जानकारी पायेंसतत विचारले जाणारे प्रश्न
ऊस लागवड कोणत्या महिन्यात करावी ?
भारतात उष्ण हवामान जास्त असते त्यामुळे पावसाळा सुरु झाल्यावर म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिण्यामध्ये आणि फेब्रुवारी ते मार्च मंडे उष्णता कमी असते त्या वेळेला ऊस लागवडीसाठी योग्य काळ मनाला जातो. साधारणतः महाराष्ट्रात डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या मध्यपरेंत नवीन लागण होते. ऑक्टोंबर ते नोंव्हेबर मध्ये आडसाली उसाची खाते टाकून पण देण्यास सुरुवात होते.
ऊस तयार होण्यासाठी किती महिने लागतात ?
उसाच्या अनेक प्रकारची वाण आहेत त्यामध्ये प्रत्येक वाण तोडणीस येण्यासाठी थोडा कमी जास्त कालावधी लागतो आणि तोडणीच्या कालावधी पाणी आणि पिकाच्या वाढीवर अवलंबून असतो. साधारणता 14 ते 16 महिने उसाचे पिकाचा कालावधी आहे.
उसाचे जास्त फुटवे येण्यासाठी काय करावे?
उसाच्या चांगल्या वाढीसाठी नत्राची आणि स्फुरद या खताची गरज असते. उसाची चांगली वाढ उसाला जास्त फुटवे देतात. चांगल्या मुळाची संख्या वाढल्याने पिकाची जोमाने वाढ होते आणि झाडाची चयापचय क्रिया चांगली होऊन जास्त फुटवे फुटतात. त्यासाठी योग्य प्रमाणात नायट्रोज आणि दुय्यम अन्न घटकाचे नियोजन हे चांगली फुटींची संख्या देऊ शकतात.